Breaking News

अकार्यक्षम पदधिकारी व नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या प्रभाग ७ व ८ या भागातील गटारीचे पाणि गोरगरीब जनतेच्या घरात - कमलेश लांडगे

अकार्यक्षम पदधिकारी व नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या प्रभाग ७ व ८ या भागातील गटारीचे पाणि गोरगरीब जनतेच्या घरात - कमलेश लांडगे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव नगरपरिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दुर्लक्षित केलेल्या प्रभाग 7 व 8 तसेच शहरातील इतर प्रभागात देखील हिच परिस्थिती आहे या भागातील गटारीचे पाणि गोरगरीब जनतेच्या घरात घुसून सर्वसामान्य जनतेची अवहेलना झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कमलेश लांडगे यांनी मराठवाडा साथीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.अलिकडेच चार पाच दिवसांपासून शेवगाव शहरातील काही भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळले त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेवगाव च्या तहसिदार अर्चना पागिरे आणि नगरपरिषद यांच्याकडून शेवगाव शहर अत्यवश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आशा परिस्थिती इतर रोगराईचा शहरात शिरकाव होऊ न देण्यासाठी शेवगाव 
नगरपरिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी योग्य ती साफसफाई कर्मचार्‍यांकडून करुन घेण्याची गरज असताना ऐन पावसाळ्यात गटारी घाणीने गच्च भरलेल्या अवस्थेत होत्या आणि काल परवाच्या पावसामुळे गटारीचे संपूर्ण पाणी सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरले आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कमलेश लांडगे यांनी दिली 
आहे.त्याचबरोबर शेवगाव शहरातील जनतेने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे व हात स्वच्छ धुवून तोंडाला नियमीत मास्क लावून आपली व शहराची काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.