Breaking News

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या राज्य सल्लागारपदी नगरचे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया !

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या राज्य सल्लागारपदी नगरचे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया
अहमदनगर :
 -  २८ जुलै जागतिक निसर्ग दिवस ह्याचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) हया संस्थेने अहमदनगरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पर्यावरण तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया हयांची साईबन ची निर्मिती करून त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण, संवर्धन, जनजागृती, वृक्षारोपण आणि संवर्धन हया कार्याची राज्यपातळीवर दखल घेऊन हया संस्थेच्या सल्लागारपदी सन २०२० ते २०२५ हया कालावधीकरिता निवड जाहिर करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे असे पत्र संस्थेच्या वतीने वृक्षमित्र मा. सदस्य राष्ट्रीय वनीकरण विकास बोर्ड वन व पर्यावरण मंत्रालय भारतसरकार मा.आबासाहेब मोरे हयांनी साईबनचे निर्माते डॉ. प्रकाश कांकरिया हयांना सन्मानीत केले.

 मागील २५ वर्षापूर्वी अहमदनगरच्या एम आय डी सी मागे निंबळक शिवारात सुमारे १०० एकर उजाड माळरानात डोंगर जिथे अनेक शतके एकही झाड उगवले नाही अशा ठिकाणाची निवड करून औद्योगीक सांडपाण्याचा उपयोग करून एक मोठे जंगल डॉ. कांकरिया दांपत्याने मानकन्हैय्या ट्रस्टच्य माध्यमातून उभे केले. पाणी अडवा पाणी जिरवा आणि मोठया प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन करून मानकन्हैय्या पर्यावरण प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी केली अपारंपारीक उर्जेचा वापर केला, पॉलिहाऊसेसचा वापर करून अतयाधुनिक फूलशेती व उजाड माळरानावर २० वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रथम महाबळेश्‍वर बाहेर स्ट्रॉबेरी उत्पादित करून सर्वांना आश्‍चर्यचकीतही केले. हयामुळे महाराष्ट्र शासनाने १५ वर्षापूर्वी राज्यस्तरीय प्रथम वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले व केंद्रशासनानेही त्यांना अनेक पुरस्कार देऊन सनमानीत केले आहे.

 अनेक वर्षापासून सेंद्रिय शेती करून ती कशी फायदेशीर असते हे ही दाखवून दिले. डॉ. सौ. सुधा कांकरिया हयांनी आध्यात्माची जोड देऊन आध्यात्मिक अशी यौगिक शेतीची संकल्पनाही महाराष्ट्रात आदर्श उभा केला. नेत्रतज्ञ असूनही डॉ. कांकरिया दांपत्याने आपण समाजाचे काही देणे लागतो त्या भावतेतून १०० एकर उजाड खडकाळ डोंगराळ माळरानावर साईबन उभारले हयाबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे असे वृक्षमित्र श्री आबासाहेब मोरे हयांनी सांगितले.

 साईबन हया प्रकल्पाला मी निमित्तमात्र असून हयाचे खरे श्रेय मार्गदर्शक वनराई पुणे चे श्री मोहन धारिया, ग्रामविकासाचे मार्गदर्शक मा. श्री अण्णा हजारे, मा श्री पोपटराव पवार श्री रा. रं. बोराडे साहेब यांना जाते. साईबन ही एक टीम आहे हयात काम करणार्‍यांच्या श्रमीचा हा सन्मान म्हणून मी स्विकारतो असे डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सांगीतले.