Breaking News

पिंपळगाव निपाणी येथे आढळला कोरोना रुग्ण.

गणोरे/प्रतिनिधी :- 
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी  येथे आज कोविड - 19 रुग्ण आढळून आल्याची माहिती प्रशासनानी दिली.
      पिंपळगाव निपाणी येथील कांदा व्यापारी (वय 35) यांना व त्यांच्या पत्नीलाही लागण झाल्याचे समजतेय. कांदा व्यापारी यांच्या कुटुंबातील एकूण 12 जणांचे असे एकूण 23 जणांचे स्वब संगमनेर येथे तपासणी पाठवण्यात आले आहे. 
पिंपळगाव निपाणी येथील गावकरी स्वयंस्पुर्तीने 4 दिवस बंद राहणार आहेत. कॅन्टोन्मेंट झोन 14 दिवसांसाठी प्रतिबंधित ठेवण्यात येणार आहे. पिंपळगाव निपाणी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद.
           गणोरे व पंचक्रोशीतील नागरिकांची गणोरे येथे मोठी ये जा असते गावाच्या जवळच रुग्ण आढळून आल्यामुळे गणोरे येथील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गणोरे येथील एका खाजगी दवाखान्यातील डॉक्टर व त्यांच्या कर्मचारी यांना खबरदारी म्हणून कोरंटाईन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. गणोरे गाव पूर्णपणे सुरक्षित आहे. गावातील नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करावेत.अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.