Breaking News

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण !  "शनी सारखी काहींवर कृपा तर काहींवर अवकृपा का ? "  भिंगारकर जनतेचा प्रश्न .         
 भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण .
भिंगार/ प्रतिनिधी :
     भिंगार  शहरात भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  त्याबाबत योग्य ती खबरदारी व उपाय योजना करीत असून सुद्धा भिंगार शहरात कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत  असून धक्कादायक वृत्त हाती आले असून भिंगार कॅन्टोन्मेंट कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून  त्यांना पुढील उपचारासाठी  कॅन्टोन्मेंट बोर्ड   डॉ. बी .आर. आंबेडकर जनरल हॉस्पिटलमध्ये  दाखल  केले आहे .तर उर्वरित संशयित रुग्णांना भिंगार कॅन्टोन्मेंट शाळा .लॉन्स मध्ये  दाखल करण्यात  आलेले अाहे. याआधी भिंगार मधील शहरातील बाधित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे तर संशयित रुग्णांना भिंगार मधील कॅन्टोन्मेंट लॉन्स अथवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेत कॉरनटाईन करतात.परंतु कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांना  कोरोना लागण झाल्याचे समजतात त्यांना कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आल्याने सामान्य भिंगारकर जनतेला सिव्हिल हॉस्पिटल किंवा कॅन्टोन्मेंट लॉन्स / शाळा  तर   बोर्डांच्या कर्मचाऱ्यांना   कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केलया मुळे  कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासन सामांन्य नागरिकां बाबत असा दुजाभाव का  ? करत आहे .  '"शनी सारखी काहींवर कृपा तर काहींवर अवकृपा का ?  "   असा  प्रश्न  सामांन्य भिंगारकर नागरिकांना पडला असुन  त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया भिंगारकर नागरिक व्यक्त करीत आहेत .