Breaking News

लाचघेताना पकडलेल्या साबणे ची कसुन चौकशी सुरु !

लाचघेताना पकडलेल्या साबणे ची कसुन चौकशी सुरु !
कोपरगाव /तालुका प्रतिनिधी :
    कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथिल तलाठी सुनिल मच्छिंद्रनाथ साबणे मुळगाव गंगापुर जि.औरंगाबाद सध्या नोंकरी कुंभारी येथे करणाऱ्या तलाठी सुनिल साबणे पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने २९ जूलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्याच कार्यालयात गजाआड करुन धाडसी कारवाई केली या घटनेने कोरोना माहामारी चालु असतानाही महसुल विभागाचा भ्रष्टाचार कमी झाला नाही हे अधोरेखीत होते यात लगतच्या काळात लाचलुचपतच्या चौकशीत साबणेला पाठबळ देणारे कीती अधिकारी  चौकशीच्या रडारवर येतात याची उच्छुकता कोपरगाव  तालुक्यातील जनतेला आहे.
         कोपरगाव महसुल विभागाचे पाठबळ व आलेल्या प्रत्येक तहसिलदाराची मेहरनजर यामुळे सुनिल साबणे याचे महसूल मंडळ बदलले मात्र गेली दहाही वर्ष गोदावरी नदीतील तोच वाळू साठा साबनेच्याच अंतर्गत कसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली गेली याच गोदावरीच्या पाञात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुनही अर्थपूर्ण  संबंधामुळे दुर्लक्ष केले गेले जनतेत वाळू तस्कर व महसुल यांची मैत्री असते अशी दबक्या आवाजात चर्चा असताना ह्याच सर्कल अंतर्गत आत्तापर्यत चारवर्षात  लाचलुचपतच्या सापळ्यात अडकलेला साबणे हा चौथा महसूल कर्मचारी आहे अवैद्य माध्यमातून मिळालेल्या पैशातुन हा तलाठी सामान्य जनतेबरोबर पञकारांनाही जुमानत नव्हता यातुन महसुलचा आर्शिवाद व अधिका-यांचे पाठबळ असल्याशिवाय हे घडु शकत नाही राञी बे राञी पैसे गोळा करण्यासाठी साबणे व त्याचे काही सहकारी कधी शासकीय तर कधी खाजगी वहानातुन भिरत प्रशासनाचा व दंडाचा धाक दाखवून लाखो रुपये गोळा करत असताना हा साबणे महसुल मध्ये अनेकांना जड झाला होता कमी बोलणे जनतेशी कमीतकमी संपर्क किरकोळ तांत्रिक चुका व ञुटी दाखवत खरेदी विक्रीच्या नोंदी न घेणे कौटोबिक विभक्त वारसा नोंदी न करणे अशा कामाखाली मोठ्या प्रमाणावर माया देखील यांनी  गोळा केली आहे यातुन कोपरगाव, औरंगाबाद ,गंगापुर या मराठवाड्याच्या भागातही मोठ्या प्रमाणावर जंगम मालमत्ता गोळा केली आहे यातुन पेट्रोल पंप देखील त्याच्या नातेवाईक यांच्या नावावर सुरु आहे पैशाच्या मोहाने कमीतकमी झोप व जास्तीत जास्त गोदा काठच्या परिसरात फिरणारा अनेक वेळा वहाने पकडुन गुन्हे दाखल करुन प्रामाणिक पणाचा आव आणणारा हाच साबणे वरिष्ठ अधिका-यांत माञ गेल्या १० वर्षात कायमच लोकप्रिय राहीला या मागे सुध्दा वाळू तस्करीतुन मिळणारी लक्ष्मी च कारणीभूत ठरली असुन याबाबत नाशिक विभागाचे लाचलुचपतचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे यांची प्रतिक्रिया  घेतली  असता ते म्हणाले की साबणे प्रकरणात कठोर चौकशी चालु असुन अवैद्य मार्गातुन स्थावर संपत्ती मिळवणे गुंतवणूक करणे त्यासाठी सहकार्य करणारे पाठबळ देणारे ह्या बरोबरच कुणाच्या आर्शिवादाने हे काम सुरु होते हेची देखील संकेत घेऊन लगतच्या काळात आणखी धक्कादायक माहीती समोर येऊ शकते असे सांगत कठोर चौकशी सुरु असल्याचे सांगितले .

[ लक्ष्मी दर्शन घेऊन खिशात घालणारा  साबणे --
कुंभारी येथे तलाठी म्हणून कामकरणारा साबणे नेहमीच पैसारुपी लक्ष्मी वाळू तस्करा कडुन मिळाल्या नंतर दर्शन घेऊन खिशात असलेल्या पाकीटातील कुलदैवतेला टच करुन पैसे ठेवत असल्याने आपल्यावर कधीच संकट येणार नाही ही धारणाच त्याला गजाआड करणारी ठरली ]