Breaking News

राजस्थानात भाजपाला धक्का - सहा आमदारांविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

राजस्थानात भाजपाला धक्का - सहा आमदारांविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !
- राजस्थानातील सत्ता संघर्ष
जयपूर/प्रतिनिधी
गेल्या दोन आठवड्यांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला असून, अजूनही त्यावर पडदा पडलेला नाही. सचिन पायलट समर्थक आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असतानाच भाजपनेही बहुजन समाज पक्षाच्या आमदारांसंबंधात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
काँग्रेसने सोमवारी (२७ जुलै) सर्व राज्यांच्या राजभवनासमोर निदर्शने केली. एकीकडे काँग्रेस अधिवेशन बोलावण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असतानाच भाजपाने बहुजन समाज पक्षाच्या आमदारांच्या प्रवेशाला विरोध करणारी याचिका राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने भाजपाची ही याचिका फेटाळून लावली. राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपाचे सहा आमदार निवडून आले होते. या सहा आमदारांच्या गटाने अशोक गेहलोत यांच्या सरकारला पाठिंबा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.