Breaking News

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ च्या सदस्य पदी सौ चेतना किरण मांगडे यांची निवड !

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ च्या सदस्य पदी सौ चेतना किरण मांगडे यांची निवड 
  श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी :
      पर्यावरण संरक्षण व तत्संबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) या संस्थेच्या सदस्यपदी चेतना मांगडे यांची निवड करण्यात आली. हि निवड २०२० ते २०२५ या कालावधी करिता निवड समितीने केली असून संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र मा श्री आबासाहेब मोरे यांनी सौ चेतना मांगडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच बुद्धीकौशल्य वापरून व समाजहित जोपासत पर्यावरण पुरक कार्य कराल व संस्थेचे नाव उज्ज्वल कराल हि अपेक्षा व्यक्त केली.  या निवडीबद्दल माजी शिक्षण केंद्र प्रमुख श्री गुलाबराव मांगडे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन संभाजी घुटे, उपसरपंच ज्ञानेश्वर मांगडे, युवा नेते राहुल मांगडे, मेजर राजेंद्र मांगडे, मेजर बापूसाहेब मांगडे यांनी अभिनंदन केले. तसेच यानिवडीनंतर परिक्रमा संकुलाच्या अध्यक्ष डॉ प्रतिभाताई पाचपुते यांनीही नवनिर्वाचित सदस्य  सौ चेतना मांगडे यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा  दिल्या.