Breaking News

मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.जयश्री भगवान धावडे यांची बिनविरोध निवड.

कोळगाव/प्रतिनिधी 
श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा सौ. कल्याणी अमोल गाढवे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंचपदी सौ. जयश्री भगवान धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ.महानंदा फुलसिंग मांडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक गोरक्षनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.
श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा सौ. कल्याणी अमोल गाढवे यांनी ठरलेल्या वेळेत १ वर्षाने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी निर्धारित वेळी सौ.जयश्री भगवान धावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच महानंदा मांडे व ग्रामसेवक गोरक्षनाथ गायकवाड यांनी जाहीर केले. उपसरपंच पदी निवड झाल्याने सौ.जयश्री भगवान धावडे यांचे तर गेल्या १ वर्षाच्या कार्यकाळात गावा मध्ये विधायक कार्य करत विविध उपक्रम राबवत गावाला उज्ज्वल भविष्याकडे नेल्याने माजी उपसरपंच सौ. कल्याणी गाढवे यांचा उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी प्रा.फुलसिंग मांडे,ग्रा.सदस्य दिपक गाडे ,काळूराम ससाणे,लक्ष्मण मांडे, गणेश मांडे ,बापूराव बर्डे ,राहुल साळवे ,भगवान धावडे ,अंबादास मांडे , संदीप मांडे ,अमोल गाढवे ,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन उंडे आदी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण मांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिपक गाडे यांनी मानले.