Breaking News

सीबीएसईच्या परीक्षेत संजीवनी अकॅडमीचा निकाल १०० टक्के-सौ. मनाली कोल्हे

सीबीएसईच्या परीक्षेत संजीवनी  अकॅडमीचा निकाल १०० टक्के- सौ. मनाली कोल्हे
  (  ९६ टक्के गुण मिळवुन कार्तिक ठोंबरे प्रथम )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
  सीबीएसई परीक्षा मंडळाने  आज जाहीर केलेल्या इ. १० वी च्या निकालात संजीवनी अकॅडमीचा निकाल १०० टक्कें लागला असुन स्कुलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. कार्तिक ठोंबरे या विध्यार्थ्याने ९६ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांक पटकाविला आहे, अशी  माहिती स्कुलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी दिली आहे.
चैतन्य अग्रवाल याने ९४ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. यशश्री चौधरी  हीला ९३. ६० टक्के गुण मिळुन ती तिसऱ्या  गुणानुक्रमाने उत्तिर्ण झाली. आयुशी  कापगते व भाविका वन्ने यांनी अनुक्रमे ९३. ४० टक्के व ९१. २०  टक्के गुण मिळवुन स्कुलमध्ये अनुक्रमे ४ था व ५5 वा क्रमांक मिळविला. यात ६ विध्यार्थ्यानी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले तर   बहुतांशी   विध्यार्थानी ८० ते ९० टक्यांमध्ये गुण मिळविले आहे. 
चैतन्य अग्रवाल ने सोशल सायन्स विषयात १००  पैकी १०० गुण मिळवुन या विषयात संपुर्ण बोर्डात पहिला क्रमांक मिळविला तर यशश्री चौधरी  व कार्तिक ठोंबरे यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन या विषयात बोर्डात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक  अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे ,  कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे  यांनी सर्व गुणवंत व यशस्वी विध्यार्थी  व प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम व सर्व शिक्षकांचे  अभिनंदन केले आहे.