Breaking News

कितीही विनवण्या केल्या तरी तुम्ही घराची लक्ष्मण रेषा ओलांडत आहात - तहसीलदार ज्योती देवरे !

कितीही विनवण्या केल्या तरी तुम्ही घराची लक्ष्मण रेषा ओलांडत आहात - तहसीलदार ज्योती देवरे
--------------
तहसीलदार ज्योती देवरे यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
--------------
तुम्ही ओलांडलीच आहे लक्ष्मण रेषा अजून थोडी ओलांडा लक्षणे दिसत असतील तर लगेच टेस्टिंग लॅब काठा!
शशिकांत भालेकर/पारनेर तालुका प्रतिनिधी : 
पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे  या  कोरोना काळामध्ये प्रशासक म्हणून सर्व आघाड्यावर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मात्र दि 19 जुलै रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्कात आल्यामुळे व त्यांना काही प्रमाणात त्रास होत असल्यामुळे त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली तो अहवाल निगेटिव्ह  प्राप्त झाला आहे त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
      पारनेर तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता आलेख हा चिंतेचा विषय ठरत आहे. तालुक्यातील जनतेने आता याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. म्हणून तालुक्यात लोक उपचारासाठी किंवा स्वतःच्या सुरक्षेसाठी गावाकडे धाव घेत आहेत मात्र गावी आल्यानंतर या लोकांनी गावातील विलगीकरण कक्षामध्ये थांबणे बंधनकारक आहे तसे केल्यास कोरोना चा संसर्ग व बाधा इतरांना होणार नाही आम्ही आपणास कितीही विनवण्या केल्या तरीही तुम्ही घराची लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर पडतच आहात त्यामुळे संसर्ग वाढत आहे गीत रामायणाच्या क्लिप मध्ये सांगितल्यानुसार आपण घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका असे आवाहन वारंवारपारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
     तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तसेच ग्रामीण भागात कोरोना चा समूह संसर्ग  झाला आहे. ग्रामीण भागातील स्थानिक लोकांना आता बाधा होत आहे ते कोणाच्याही संपर्कात न जाता ही  त्यांना कोरोना बाधा झाली असल्याचे काही उदाहरणांवरून समोर येत आहे. तर बरेच कोरोना बाधित हे मुंबई-पुणे किंवा अन्य शहरांतून तालुक्यात आले आहेत या पुढे ही संख्या वाढली तर आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन तसेच तालुक्यातील नागरिकांसाठी हा चिंतेचा विषय होणार आहे. आत्ताच नागरिकांनी यावर गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे कोरोना मुळे काय होत नाही या अविर्भावात अजूनही अनेक जण आहेत. मात्र संख्या वाढली तर आरोग्य यंत्रणेला अधिक प्रमाणात ताण वाढेल त्यासाठी प्रत्येकाने घरामध्ये थांबून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे असताना लोक मात्र मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना मुळे लॉक डाऊन केले गेले होते शासनाने बंदी घातल्यामुळे लोकांनी बाहेर पडणे थांबवले मात्र शासनाचे बंधन कमी होताच लोक कोरोना संपला आहे अशा अविर्भावात बाहेर पडत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना बधितांचा तालुक्यातील आकडा ही धोक्याची घंटा आहे.
समूह संसर्ग सुरू झालेला आहे सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर आपला कशालाही हात लागला संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे घराची लक्ष्मण रेषा ओलांडू नका हि गीत रामायणाच्या क्लिप ची आठवण पुन्हा तहसीलदार ज्योती देवरे यांनी करून दिली आहे. लोकांनी लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर त्याचे दुष्परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना बाबत पुन्हा एकदा गांभीर्य लक्षात  घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा अलर्ट होणे गरजेचे आहे. स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतली पाहिजे.

 तालुक्यातील सर्व जनतेने माझ्यावर जे मोठ्या ताई प्रमाणे प्रेम केले त्याची ही पावती आहे....
-----
राज्यमंत्री महोदय यांचे स्वागत करताना शिष्टाचाराच्या भाग म्हणून नकळत मी माझा स्वतः चष्मा व मास्क काढला होता तेव्हा साहेबांनी मला आधी मास्क लावा मॅडम म्हणून सांगितले. कदाचित त्यांच्या सूचनेमुळे अनर्थ टळला आहे त्याच काळात मला थोडा वायरल इन्फेक्शन मुळे त्रास जाणवत होता त्यामुळे चिंता वाटत होती पण सकारात्मक राहून वैद्यकीय उपचार सुरू करून खबरदारी म्हणून स्राव तपासणी करून घेतली.
मा. जिल्हधिकारी व प्रांताधिकारी आमदारसाहेब व सर्वांना जी काळजी घेतली ती जपुन ठेवेल व यापुढे अधिक काळजी व ऊर्जेने सेवा करेल.
---------
ज्योती देवरे 
तहसीलदार पारनेर
-----------
 नाका ला वास न येणे, तोंडाची चव जाणे, ताप येणे, अंग दुखणे,सर्दी खोकला श्वास घ्यायला त्रास होणे,गिळताना त्रास होणे,घसा दुखणे,जुलाब होणे, तीव्र अंगदुखी हे लक्षणे दिसताच कोरोना ची चाचणी केली पाहिजे.
----------------
 तुम्ही ओलांडलीच आहे लक्ष्मण रेषा अजून थोडी ओलांडा लक्षणे दिसत असतील तर लगेच टेस्टिंग लॅब काठा!

सध्या कोरोना चा संसर्ग वाढत आहे परंतु जे कोरोना बधितांच्या संपर्कात येत आहेत ते स्वतः पुढे येऊन चाचणी करायला नकार देतात किंवा आपली माहिती लपवून ठेवत आहेत ग्रामीण भागांमध्ये हा प्रकार वाढत आहे मात्र अशा लोकांनी समोर येऊन खाजगी किंवा शासकीय यामध्ये आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी त्यामुळे पुढील धोका टळू शकतो ज्यांना काही लक्षणे दिसत असतील तर त्यासाठी प्रायव्हेट लॅब शी संपर्क करून त्यांना गावातच स्राव घेण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न केला जाईल ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांनी प्रायव्हेट मध्ये स्वतःची चाचणी करून घ्यावी ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल त्यांना पारनेर येथे स्राव घेतला जाईल व त्यांच्या घरी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था असेल त्यांना स्राव घेऊन घरी पाठवले जाईल असे ज्योती देवरे यांनी सांगितले.