Breaking News

पाथर्डी शहरात दुपारपर्यत १२ रुग्ण पॉझिटिव्ह; शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा यामध्ये समावेश !पाथर्डी शहरात दुपारपर्यत १२ रुग्ण पॉझिटिव्ह; शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा यामध्ये समावेश !
पाथर्डी/प्रतिनिधी :
 शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय येथे ३६ रुग्णांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली असुन दुपारपर्यत १२ रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न  झाले आहे.
   यामध्ये आज निघालेले १२ रुग्ण हे पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर,नाथनगर,खंडोबा नगर,हरिजन वस्ती (कसबा) तर तालुक्यातील तिनखडी,चिंचपूर इजदे,निपाणी जळगाव या गावातील कोरोना रुग्ण आहेत.यामध्ये शहरात ८,निपाणी जळगाव २,तिनखडी १,चिंचपूर इजदे १ याप्रमाणे असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली आहे.