Breaking News

राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम - श्री अमित कोल्हे

राष्ट्रीय  रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम    - श्री अमित कोल्हे
( ३२,००० टीम्स मधुन संजीवनीने सिध्द केली तंत्रज्ञानातील घौडदौड )
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने प्रायोजीत केलेल्या व आय. आय.टी. पवई, मुंबई या संस्थेने आयोजीत केलेल्या राष्ट्रीय  पातळीवरील ई यंत्रा रोबोटीक्स स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ३२,००० गटांमधुन प्रथम क्रमांक मिळवुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागात असुनही तंत्रज्ञान क्षेत्रात देशात  अव्वल असल्याचे सिध्द केले, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे की आय.आय.टी. मुंबईने मार्च २०२० मध्येच या स्पर्धेसाठी प्रवेश  पात्रता चाचणी घेतली होती. या चाचणीत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील कुणाल भारत आगलावे, साक्षी राजशेखर  भुसे, श्रेयस प्रकाश  कुलकर्णी व अथर्व शैलेश जोशी  हे उत्तिर्ण झाले. या स्पर्धेसाठी पॅट्रोलिंग रोबोटिक फिश  (टेहाळणी करणारा रोबोट) अशी  संकलपना देण्यात आली होती. या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी प्राचार्य  डाॅ. डी. एन. क्यातनवार, विभाग प्रमुख डाॅ. ए.जी. ठाकुर, डाॅ. बी. एस. आगरकर, प्रा. के. एन. वाकचौरे  व श्री पंडीत भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली  पाण्यात पोहणारा रोबोट तयार केला. कोविड १९ च्या निर्बंधामुळे आय. आय.टी ने अडथळे पार करून पाण्यात पोहणाऱ्या  रोबोटचा व्हिडीओ मागीतला होता. या स्पर्धेसाठी १०  मिनिटाचा अवधी देण्यात आला होता.  मात्र संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी  तयार केलेला फिश  रोबोटने अवघ्या एकाच मिनिटात शर्यतीचे अंतर कापले. त्यानंतर  आय. आय.टी.च्या पंचांनी या विध्यार्थ्यांशी  सिसको वेबेक्स द्वारे संवाद साधुन प्रश्न  विचारले. सर्व विद्यार्थ्यांनी  दिलेली उत्तरे व फिश  रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक परीक्षकांच्या कसोटीत उतरले आणि राष्ट्रीय  पातळीवर ३२,००० गटांमधुन प्रथम क्रमांक मिळवीला व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे नाविण्यपुर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सिध्द केले.
या स्पर्धेत देशातील आय.आय.टी., एन. आय.टी., शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधिल एकुण ३२,००० गटांनी सहभाग नोंदविला. मात्र संजीवनीच्या तज्ञ प्राद्यापकांचे मार्गदर्शन , येथिल प्रयोग शाळांमधिल सुविधा, नाविण्यपुर्ण उपक्रमांसाठी देण्यात येणारे प्रोत्साहन  आणि तंत्र स्नेही विध्यार्थी या सर्व बाबींमुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी  देशात  अव्वल नंबर मिळवुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव अग्रस्थानीच असल्याचे सिध्द केले.
विद्यार्थ्यांच्या  या राष्ट्रीय  पातळीवरील यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनराव कोल्हे , मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्राचार्य, विभाग प्रमुख, सर्व मार्गदर्शक  व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले