Breaking News

राष्ट्रवादीच्या आमदाराने केला नगर मध्ये नवनियुक्त भाजपा पदाधिकाऱ्यांचा सत्कार.


अहमदनगर/प्रतिनिधी 
   राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी माध्यमिक शिक्षक सोसायटी अहमदनगर वतीने भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीवर नवनियुक्त झालेले  सदस्य प्रा भानुदास बेरड  यांचा निवड झाली त्या बद्दल सत्कार केला तसेच निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री बाबासाहेब बोडखे, श्री आप्पासाहेब शिंदे, श्री महेंद्र हिंगे, श्री गणेश भोसले, श्री संपत बारस्कर, श्री सुनिल थोरात  आदी  मान्यवर उपस्थित होते.