Breaking News

गॅस सिलिंडरही भडकले!

-सलग दुसर्‍या महिन्यातही विनाअनुदानित सिलिंडर महागले

नवी दिल्ली/वृत्तसंस्था 
इंडियन ऑइल कंपनीने विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत बुधवारपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीतील 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत आता 594 रुपये झाली आहे. दिल्लीत गॅस सिलिंडर एक रुपयांनी महागला असून मुंबईत 3.50 रुपयांनी महागला आहे. गेल्या महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 11.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर सलग दुसर्‍या महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे.