Breaking News

अतिरिक्त खर्च टाळून वाढदिवस प्रसंगी तरुणांनी सामजिक कार्य करावे - राजराजेश्वरी कोठावळे

अतिरिक्त खर्च टाळून वाढदिवस प्रसंगी तरुणांनी सामजिक कार्य करावे - राजराजेश्वरी कोठावळे
---------------
आमदार निलेश लंके यांनी राजराजेश्वरी कोठावळे चा वाढदिवस प्रसंगी सत्कार केला.
पारनेर/प्रतिनिधी - 
      पारनेर येथील श्री हॉरीझॉन  स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र  या संस्थेच्या अध्यक्षा ,सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या युथ आयकॉन विजेत्या, सक्षम महिला पुरस्कार विजेत्या, राष्ट्रीय किकबॉक्सर, सेल्फ डिफेन्स ट्रेनर कुमारी राजराजेश्वरी आनंदराव कोठावळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इतर अवास्तव खर्च टाळून सांगवी सूर्या येथे वृक्षारोपण करून सध्याच्या युगात अनेक तरुण नाहक अनाठाई खर्च करून वाढदिवस साजरा करतात त्यासाठी हा चांगला संदेश राजराजेश्वरी कोठावळे यांनी दिला आहे
राजराजेश्वरी या सांगवी सूर्या तील पहिल्या युवती आहेत की  त्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून वृक्षारोपण केले व कान्हुर पठार या ठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले व टाकळी ढोकेश्वर येथील आनंदसिंधु वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आई-बाबांना मास्क वाटप करण्यात आले आणि आपले पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी राजेश्वरी ला शुभेच्छा दिल्या राजराजेश्वरी  आमचा अभिमान आहे असे संबोधित केले . यावेळी सांगवी सूर्या येथे उपस्थित गावचे सरपंच संदीप रासकर, मा.चेअरमन मोहन आढाव, व्हा.चेअरमन श्री लभाजी झंजाड, नारायण साठे, इनुस शेख, गणेश आढाव, वैभव कोठावळे, अमोल आढाव, इत्यादी उपस्थित होते व कान्हुर पठार या ठिकाणी कान्हुर पठार येथील जनता विद्या मंदिर विद्यालयात मळगंगा प्रतिष्ठान च्या वतीने गार्डन वृक्षारोपण सुशोभीकरण करण्यात आले. अनेक प्रकारची फुलझाडे लावण्यात आली.  यावेळी  नॅशनल किक बॉक्सर राजराजेश्वरी कोठावळे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चंद्रभान ठुबे विश्वस्त कोरथन खंडोबा देवस्थान, विलास महाराज लोंढे अध्यक्ष फिनिक्स NGO,संजय नवले सर,प्रमोद खामकर आणि युवासेवक उपस्थित होते. टाकळी ढोकेश्वर येथे विलास महाराज लोंढे अध्यक्ष फिनिक्स एनजीओ, ह.भ.प.लक्ष्मण महाराज कोठावळे, सुमन कोठावळे, धनेश कोठावळे, पियुष बोरुडे, वैष्णवी थोरात, निकिता औटी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

     "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या उक्तीप्रमाणे मानवासाठी वृक्षच सर्वकाही आहेत वृक्षच जीवनामध्ये आनंद देऊ शकतात त्यामुळे तरुणांनी वाढदिवस प्रसंगी वृक्षलागवड करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला पाहिजे त्यामुळे वाढदिवसाचा अनाठायी खर्चाला आळा बसेल व जीवनात आपण काहीतरी समाजासाठी यानिमित्ताने करू शकतो म्हणून मी हा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने वृक्ष लागवड करत साजरा केला आहे तालुक्यातील तरुण-तरुणींनी युवकांनी अशाच प्रकारचा वाढदिवस साजरा करावा.
-------------
राजराजेश्वरी कोठावळे
राष्ट्रीय किकबॉक्सर, सेल्फ डिफेन्स ट्रेनर.