Breaking News

नगरमधील २१ जणांना कोरोना; जिल्ह्यात दिवसभरात ४६ रुग्ण !

अहमदनगर/प्रतिनिधी : 
    जिल्ह्यात आज दिवसभरात ४६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. रात्री उशिरा आणखी २४ जणांना कोरोना झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला. सकाळी ०५, त्यानंतर रात्री नऊ वाजता १६, खाजगी प्रयोगशाळेत नुसार ०२ आणि आता रात्री उशिरा साडेदहा वाजता पुन्हा २४ जणांचे अहवाल आले आहेत. नगर शहरातील २१, जामखेडमधील दोन आणि पारनेरमधील एका रुग्णाचा यात समावेश आहे. नगर शहरातील सर्वाधिक रुग्ण हे गवळीवाडा येथील आहेत.