Breaking News

पारनेर शहरामध्ये कोरोना बाधित व्यक्तींचा वावर, आज शहरामध्ये पूर्ण शुकशुकाट, बाजारपेठ पूर्ण बंद


प्रतिनिधी/ पारनेर : 
पारनेर शहरामध्ये कोरोना बाधित व्यक्तींच्या झालेल्या वावरामुळे नागरिकांनी खबरदारी घेतली तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असल्याने अनेकजण शनिवारी घराबाहेर पडलेच नाहीत यामुळे संपूर्ण शहरांमध्ये शुकशुकाट दिसत होता बाजारपेठाही यामुळे बंदच होत्या.
पारनेर तालुक्यात तिखोल येथील ठेकेदार भोंद्रे ग्रामसेवक व कोळगाव येथून पारनेर येथील खाजगी हॉस्पिटल ला उपचारासाठी आलेला व्यक्ती या तीनही व्यक्ती  चा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पारनेर करांनी शहरांमध्ये फिरण्याचे टाळले त्यामुळे पारनेरच्या सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.
 पारनेर तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे बाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे जवळपास 60 हून अधिक कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे पारनेर मध्ये कोरोना बाधित व्यक्तींचा वावर झालेले पंचायत समिती व हॉस्पिटल हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून 100 मीटर परिसर सील करण्यात आला होता.
पारनेर मधील हॉस्पिटलमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथून आलेल्या पेशंट एक दिवस पारनेर येथील हॉस्पिटलमध्ये मुक्कामी होता अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे त्या हॉस्पिटलमधील पाच जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहे त्याचप्रमाणे तिखोल येथील ठेकेदार व भोंद्रे येथील ग्रामसेवक यांच्या संपर्कात आलेल्या 57 जणांचे स्राव घेण्यात आले आहे त्यात पंचायत समिती मधील 11 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे
जिल्ह्यातील एका आमदाराला कोणाची बाधा झाली त्याच्या संपर्कातील तालुक्यातील दोघांचा स्राव घेण्यात आला आहे कान्हूर मधील 16 जणांची चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तर एक प्रलंबित आहे पिंपळगाव रोठा येथील लोकांचे  निगेटिव्ह  5  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर तर कुंभरवाडी येथील एका चा पोजिटिव्ह आला तालुक्यात असे एकूण सहा कोरोना बाधित अहवाल प्राप्त झाले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील कोरोना बाधिता ची संख्या व संपर्कात आलेल्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे अनेक लोकांची कोरोना चाचणी स्राव  घ्यावे लागले मात्र यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलेला आहे पारनेर शहरामध्ये अद्याप एकही कोरोना बाधित आढळला नसला तरी शहरालगत असणाऱ्या कुंभारवाडी मध्ये एक कोरोना बाधित अहवालात निष्पन्न  झाले आहे तसेच पारनेर शहरांमध्ये पंचायत समिती आवारामध्ये कोरोना बाधित ठेकेदार व ग्रामसेवक या व्यक्ती येऊन गेल्या होत्या तसेच एका खासगी हॉस्पिटलमध्ये देखील कोरोना बाधित व्यक्ती मुक्कामी असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे पारनेर शहरांमध्ये कोरोना बाकीच व्यक्तींचा वावर झाला असल्याने ते व्यक्ती कोणाच्या संपर्कात आले आहेत का  हे शोधण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता शहर पूर्ण बंद ठेवण्याची अहवान प्रशासनाने केले होते मात्र शनिवारी दुकान उघडणे अपेक्षित होते तरीही व्यापाऱ्यांनी  बाजारपेठ बंद ठेवली  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आता काळजी घेण्याचे व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे अहवान तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.

पिंपळगाव रोठा येथील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर पूर्ण पिंपळगाव रोठा 14 दिवसांसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे तसेच पारनेर शहरालगत कुंभारवाडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येथे देखील कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे पारनेर येथील प्रलंबित अहवाल प्राप्त होईपर्यंत पारनेर शहराबाबत देखील कठोर व ठोस उपाय योजना करण्यात येणार आहे असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.