Breaking News

सध्या काही बंधने लादून घेण्याची गरज :- पोलिस निरीक्षक पाटील

काही बंधने लादून घेण्याची गरज :- पोलिस निरीक्षक पाटील
जीवन महत्त्वाचे आहे :- प्रा मधूकर राळेभात
नागपंचमी काळात जामखेडला जनता कर्फ्यू  :- तहसिलदार
जामखेड प्रतिनिधी :
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून बाधितांची संख्या सर्वत्र वाढतांना दिसत आहे. अशा वेळी आपण व आपलं कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी नागरिकांनी काही बंधन लादून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी केले. 
जामखेडला नागपंचमी उत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तहसिल कार्यालयात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक शामीर सय्यद, बिभीषण धनवडे, विकास राळेभात, पवन राळेभात, उमर कूरेशी, मंगेश आजबे, ताहेरखान, गफ्फार पठाण सह मोजके प्रमुख नागरिक व आधिकारी उपस्थित होते. 
या वेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, तहसिलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी सण उत्सव साजरे करतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियम अटींची सविस्तर माहिती दिली. प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक शामीरभाई सय्यद, विकी सदाफुले, हानिफभाई कुरेशी,जमीर सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. 
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले की 
नागपंचमीच्या काळात लोकांची गर्दी टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार जनता कर्फ्यू लागु करणार आहे.  यापुर्वी जनता कर्फ्यू मध्ये सर्व दुकाने बंद होती मात्र अनेक नागरिक रस्त्यावर फिरत होती. आता तसे चालणार नाही आपल्याच भल्यासाठी हा जनता कर्फ्यू असणार आहे त्याचे पालन सर्व नागरिकांनी करण्याचे आवाहन महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशासनाने केले. 
यावेळी प्रा मधूकर राळेभात म्हणाले की राज्यात प्रसिद्ध असणारा  नागपंचमी उत्सव यावेळी कोरोनामुळे होणार नाही.जीवन महत्त्वाचे आहे. जीवन राहिले तर असे अनेक उत्सव सण साजरे करता येतील तेव्हा सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. 
 तसेच नगरसेवक शामीर सय्यद व हानिफभाई कुरेशी यांनी 
मस्जिदमध्ये पाच लोकांना नमाज पठण करण्याची नियम अटींनुसार परवानगी देण्याची विनंती केली. आम्ही नियमांचे पालन करू असेही हानिफभाईंनी सांगितले. 


. तर दूकान सात दिवस सिल!
-----------------------
अनेक वेळा अवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूकानदारांनी प्रशासनाच्या नियम अटींची उल्लंघन करू नये. ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवावे, स्वतः मास्क लावावे,चालू बंदच्या वेळा पाळणे,
आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे दूकान सात दिवस सिल केले जाईल असे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी सांगितले