Breaking News

चोवीस तासात खुनाचा गुन्हा उघड करण्यास भिंगार कॅम्प पोलिसांना यश स. पो. नि. प्रवीण पाटील.चोवीस तासात खुनाचा गुन्हा उघड करण्यास भिंगार कॅम्प पोलिसांना यश स. पो. नि. प्रवीण पाटील. 
 भिंगार/प्रतिनिधी : 
    भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराबाभळी शिवारात  सापडलेल्या मयत इसम रावसाहेब कुंडलिक दारकुंडे रा. शहापुर. ता.जि.अहमदनगर याची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपी १)  दीपक बाप्पू पाचारणे .वय.३० . २) खंडू रामभाऊ गाडेकर वय. ४७. रा. दोघेही .शहापूर . ता.जि.अहमदनगर यांना अटक केली असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे . सदर खुनाचा गुन्हा २४ तासाचा उघडकीस आणल्याबद्दल भिंगार पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील , पो.उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी , पंकज शिंदे , भैय्यासाहेब देशमुख, पोलीस कर्मचारी स.फौ. राजेंद्र गायकवाड , दिपक पाठक , पो.हे.कॉ.भाऊसाहेब आघाव, रवींद्र घायतडक, रमेश बराट,अजय नगरे, बाबासाहेब गायकवाड  ,गोपीनाथ गोडै , राजू सुद्रिक ,भानुदास खेडकर, संतोष अडसूळ , राहुल द्वारके , संजय काळे , अरुण मोरे , इ.पोलिस कर्मचाऱ्यांनी  तपास कामी सहकार्य केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह , मा.अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब , व उप विभागीय अधिकारी पोलीस अधिकारी संदीप मिटके साहेब अहमदनगर यांनी सर्वांचे कौतुक केले आहे .