Breaking News

नगर-मनमाड रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा परिणामांस तयार रहा-श्री सुमित कोल्हे !

नगर-मनमाड रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा परिणामांस तयार रहा-श्री सुमित कोल्हे 
                                               
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
 ‘माझ्या समोर साईबाबा काॅर्नर वरील मोठ्या  खड्याात मोटर सायकल स्वाराचा अपघात झाला. अनेक ठिकाणी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकदा निवेदने  दिली, मात्र काम होत नाही. एकीकडे टोल वसुली मात्र चालु आहे. टोल कंपनी आपल्या अधिपत्याखाली काम करते. आपण त्वरीत रस्त्याची दुरूस्ती करून खड्डे भरून काढा. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या  निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला खपवुन घेतला जाणार नाही, तेव्हा त्वरीत दर्जेदार दुरूस्तीला सुरूवात करा, अन्यथा परीणामास तयार रहा’, असा सज्जड इशारा  युवा नेते श्री सुमित कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला.
मागील तीन दिवसांपुर्वी सौ. सिंधुताई शंकरराव  कोल्हे यांचे वाढदिवसा मिमित्ताने साईबाबा काॅर्नर लगत वृक्षारोपन चालु असताना तेथे खड्यात  दुचाकी स्वाराचा अपघात झाला. यावेळी श्री सुमित कोल्हे तेथेच होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता  प्रशांत  वाकचौरे  यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी सदर रोड जागतिक प्रकल्प बॅंन्केच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगीतले. यावर पुढील पाठपुरावा केल्यानंतर फक्त किरकोळ मुरूम टाकुन साईबाबा काॅर्नरवरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र मुरूम पावसाने वाहुन जावुन पुन्हा खड्डे जैसे थे झाले.   सदरच्या रोडच्या देखभालीची जबाबदारी ही टोल कंपनीची असते आणि ज्या भागात टोल नसतो तेथे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असते.  
आज या बाबीची दखल घेत  सुमित कोल्हे यांनी वाकचौरे  यांच्या कार्यालयास भेट देवुन तेथे श्री वाकचौरे  व सार्वजनिक बांधकाम विभाग, येवलाचे अभियंता श्री देवरे यांच्याशी  संवाद साधुन नगर मनमाड रस्त्या अंतर्गत  साईबाबा काॅर्नर ते आंचलगाव  फाटा आणि साईबाबा काॅर्नर ते पुणतांबा फाटा या मार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावरती सोलर काटाईज लावणे, गरज असेल तेथे थर्मोप्लास्ट पट्टे आखणे व सर्व साई पट्याांची कामे करणे याबाबत मागणी केली.
   सदर प्रसंगी श्री कोल्हे पुढे म्हणाले की, ‘सध्या करोना महामारीचे संकट आहे, त्यमुळे प्रशासनावर ताण आहे. परंतु टोल कंपनी जर आपल्या अधिपत्याखाली आहे तर त्यांच्याकडून आपण कामे का करून घेत नाही ? टोल बंद करायला आम्हाला लावु नका’, असा इषाराही श्री कोल्हे यांनी दिला