Breaking News

अकोले तालुक्यात आढळले तब्बल ०७ पॅाझिटीव्ह.!

अकोले तालुक्यात आढळले  तब्बल ०७ पॅाझिटीव्ह..
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज  आणखी सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यात रुग्णसंख्या  ७३ वर पोहचली आहे ..!
तालुक्यात दुपारी  दोन कोरोना बाधित अढळल्यानंतर सायंकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित.. आढळले 
 अकोले शहरातील  धुमाळवाडीत ०७ वर्षाच्या मुलासह आई देखील   पॅाझिटीव्ह आढळली बहिरवाडीत ०३ ,पेंडशेत ०२.पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
अकोले तालुक्यात हळूहळू कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.काल पेंडीग अहवालात तालुक्यातील विरगाव येथील ३१ वर्षीय पुरुष,केळी येथील ७५ वर्षीय पुरूष 
तसेच  अहमदनगर येथे खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेली  राजुर येथील ८० वर्षिय महिले चा रिपोर्ट पॅाझिटीव्ह  आला आहे तालुक्यातील रुग्णसंख्येत समाविष्ट झाल्यानंतर आज बुधवारी दुपारी तालुक्यातील धुमाळवाडी येथील ०७ वर्षीय मुलगा व आदिवासी भागातील पेंडशेत येथील २७ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्यानंतर सायंकाळी अहमदनगर  शासकीय प्रयोगशाळेत आलेल्य अहवालात पेंडशेत येथील ८१ वर्षीय पुरुष,धुमाळवाडीतील २८ वर्षीय महिला तर बहिरवाडी येथील ९० वर्षीय व ४२ वर्षीय महिला तर ३९ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. 
आता  तालुक्यात रुग्णांची संंख्या  ७३ झाली
आहे त्यापैकी ४१ जण कोरोनामुक्त झाले २ मयत तर ३० जणांवर उपचार सुरु आहे.