Breaking News

पारनेर तालुक्यात दोन कोरोना बाधित

पारनेर/प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील खासगी रुग्णालयात तपासणी केलेला एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तसेच कुंभारवाडी येथील एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे तालुक्यात एकाच दिवशी दोन कोरोना बाधित आढळले आहेत.
    रुई छत्रपती येथील 45 वर्षीय व्यक्ती हा शारीरिक व्याधींनी आजारी होता त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आली होती त्यानंतर त्याचा स्राव कोरोना चाचणी साठी घेण्यात आला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे हा व्यक्ती दहा दिवसापूर्वीच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता.
    तसेच पारनेर शेजारील कुंभारवाडी येथे याआधी येथे एक जण कोरोना बाधित आढळला होता त्याच्यात कुटुंबातील 45 वर्षीय एक जण बाधित आढळला आहे.
दरम्यान पारनेर येथील आनंद हॉस्पिटल येथील कोरोना चाचणी अहवाल येईपर्यंत 100 मीटर परिसर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.