Breaking News

दशनाम गोसावी समाधी बचाव समिती दफनभूमी साठी जागा मिळावी कोपरगाव नगरपालिकेला निवेदन !

दशनाम गोसावी समाधी बचाव समिती दफनभूमी साठी जागा मिळावी कोपरगाव नगरपालिकेला निवेदन !

करंजी प्रतिनिधी-
 दशनाम गोसावी समाधी बचाव समिती महाराष्ट्र राज्य शाखा कोपरगाव च्या वतीने तालुका अध्यक्ष श्री वाल्मिक गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे साहेब यांना समाजासाठी दफनभूमी करीता जागा मिळावी असे निवेदन देण्यात आले.
   या साठी दशनाम गोसावी समाधी बचाव संघटनेचे संस्थापक श्री चंद्रकांतजी गिरी व अहमदनगर जिल्हाअध्यक्ष श्री राजेंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनाने निवेदन देण्यात आले हे निवेदन देते वेळी कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री वाल्मिक लक्ष्मणगिरी गोसावी,उपाध्यक्ष श्री ऋषिकेश जितेंद्र गोसावी,कोपरगाव ता.पुर्व संघटक श्री दिगंबर पुरी, कोपरगाव तालुका पक्ष्चिम उप संघटक श्री संजय भारती,
 प्रताप गोसावी आदिच्या उपस्थितीत देण्यात आले या निवेदनावर श्री सुहास गोसावी,श्री हेमंत गोसावी, श्री महेश गोसावी,श्री गौरव कोर्होळकर,श्री नंदन वाघमारे, श्री  शुभम भावसार, यांच्या सह्या आहेत.
  या निवेदनात म्हंटले आहे की आमचा गोसावी समाजाचे पूर्वापार कोपरगाव शहरात वास्तव आहे. परंपरेप्रमाणे गोसावी समाजात मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे दफनविधी केला जातो त्यास समाधी देणे असे म्हणतात तसेच गोसावी समाजासोबतच जंगम,लिंगायत,नीलकंठ, वाणी बुरुड या समाजात देखील मृत्यूनंतर दफन करण्याची म्हणजे समाधी देण्याची प्रथा असल्याने सर्व समाजाची वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्व समाजासाठी सध्या दफनभूमी साठी एकच जागा असल्याने जर अगोदर एका जागेवर दफनविधी केलेला असेल तर त्याच जागेवर दुसरा कोणी दफनविधी केला नाही पाहिजे अशी प्रथा आहे परंतु दफनभूमी साठी जागा कमी असल्याने हे शक्य होतांना दिसत नाहीय.
  त्याकरिता दि १७/४/२००४ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई च्या शासननिर्णयानुसार प्रत्येक गावात स्वतंत्र दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी असा शासन निर्णय असून त्या नियमानुसार कोपरगाव नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत गोसावी समाजाच्या दफनभूमी करिता जागा आरक्षित करून त्या जागेचा समाजास दफनभूमी करीता वापर करण्याची परवानगी द्यावी जर अशी जागा उपलब्ध नाही झाली तर नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे जागा मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती दशनाम गोसावी समाज बचाव समिती चे कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री वाल्मिक गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.