Breaking News

कोरोनाची विक्रमी वाढ

- आढळले ४८,६६१ नवे रुग्ण

नवी दिल्ली/ प्रतिनिधी
देशात कोरोनाचा सातत्याने धोका वाढत असून, चार दिवसांपासून ४५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, देशात गेल्या २४ तासात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आतापर्यंत सर्वात मोठी वाढ झाली असून, धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली. गेल्या २४ तासात देशभरात ४८ हजार ६६१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७०५ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ४८ हजार ६६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचली आहे. तर सध्या देशात ४ लाख ६ हजार ८८२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ८ लाख ८५ हजार ५५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जळपास ६४ टक्के इतके आहे.