Breaking News

पारनेर : कामधंदा का करत नाही असे विचारल्याने नवऱ्याने बायकोला केली जबर मारहाण !

पारनेर : कामधंदा का करत नाही असे विचारल्याने नवऱ्याने बायकोला केली जबर मारहाण
पारनेर प्रतिनिधी : - 
पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथे एका पत्नीने पती ला  काम धंदा का करीत नाही असे विचारलेचा राग येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत पत्नीने पती विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पारनेर तालुक्यातील पती-पत्नीमधील वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली त्यामुळे पत्नीने पती विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पत्नी घरासमोर असताना पतीस म्हटले की तुम्ही काहीतरी काम धंदा का करीत नाही असे विचारलेचा राग येऊन पतीने पत्नीला घरासमोर पडलेल्या वॉकरने पत्नी च्या उजव्या हातावर जोरात मारून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तूच कामाला जायचं व तूच संसार सांभाळायचा नाहीतर तुझे माहेरी निघून जा असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीस तू नीट राहिली नाही तर तुला संपवतो अशी धमकी दिली.
याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गुजर करत आहेत.