Breaking News

संगमनेर तालुक्यात सापडले नवीन १९ कोविड रुग्ण, कोरोना बाधितांचा एकूण आकडा सातशे पार !

संगमनेर तालुक्यात सापडले नवीन १९ कोविड रुग्ण, कोरोना बाधितांचा एकूण आकडा सातशे पार ! 
संगमनेर/प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून आज गुरुवार दि.३० रोजी मिळून आलेल्या अहवालातून एकोणवीस रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या सातशेच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आज मिळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी तालुक्यातील ओझर खुर्द येथील तीन, रायतेवाडी येथील सात, निमोणे येथील सहा आणि जोर्वे, ढोलेवाडी व कुरण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे.