Breaking News

माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी घेतली सांत्वनपर भेट

माजी गृहराज्यमंत्री  राम शिंदे यांची गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी घेतली सांत्वनपर भेट 
जामखेड प्रतिनिधी 
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री  प्रा राम शिंदे यांना नुकताच पितृशोक झाला होता. त्या पार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी  शनि दि २५ रोजी  दौर्‍यावर असताना   चौंडीतील येथील निवासस्थानी जाऊन राम शिंदे यांची सांत्वनपर भेट घेतली. 

 यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांनी राम शिंदे व त्यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचीही संवाद साधत आस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. यावेळी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, डीवायएसपी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील सह आदी उपस्थित होते.