Breaking News

भाळवणी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू !

भाळवणी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू !
कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे करण्यात आली होती कोरोना चाचणी पण ती निगेटिव्ह आली होती !
पारनेर/प्रतिनिधी- 
      पारनेर तालुक्यातील भाळवणी 36 वर्षीय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे हा कर्मचारी काही दिवसांपूर्वी भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी व तेथीलच ग्रामसेवक कोरणा बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते त्यांच्या संपर्कात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती मात्र ही कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती दोन दिवसापूर्वी या व्यक्तीला अस्वस्थ वाटत होते व त्रास होत असल्याने नगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्याच्या मृत्यू मागचे कारण हे हृदयविकार असल्याचे समोर येत आहे. 
दरम्यान भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या काही जणांना एकत्रित भाळवणी येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आली होते त्यात या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.