Breaking News

अकोल्यात आज सापडले पाच करोना बाधित !

अकोल्यात आज  सापडले पाच करोना बाधित!
अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात आज पाच नवीन करोना बाधित सापडले यामुळे तालुक्यातील  रुग्णसंख्या  आता  63 झाली आहे.तालुक्यात दोन दिवासांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या
शनिवार व रविवार एकही रुग्ण पॅाझिटीव्ह न येता  आज सकाळी ०७ जणांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक घटना असताना दुपारी अहमदनगर येथील शासकीय प्रयोग शाळेतील अहवालात तालुक्यातील पाच व्यक्ती बाधित आढळुन आल्या यामध्ये शहरातील परखतपुर रोडवरील बाधितांच्या संपर्कातील १४ वर्षीय मुलगी व बहिरवाडी येथील ३२ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी व २४ वर्षीय तरुण,तसेच कळंब येथील ३४ वर्षीय महिला अशा एकुण  ५ जणाचा  कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे .
आता  तालुक्यात रुग्णांची संंख्या वाढुन ती ६३ झाली आहे त्यापैकी ४६ जण कोरोनामुक्त झाले २ मृत झाले  तर १५ जणांवर उपचार सुरु आहे
--------------