Breaking News

शिरसगाव येथे कपाशी शेतीशाळा संपन्न.

शिरसगाव येथे कपाशी शेतीशाळा संपन्न.   
  
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
   महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने क्रोपसप योजनेअंतर्गत या खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांमध्ये की ड्रॉप खत पाणी व्यवस्थापन आदी विषयांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने मान्य तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव  यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस पिकाची शेतीशाळा शिरसगाव येथे संपन्न झाली.
 या शेती शाळेमध्ये प्रामुख्याने  सरपंच.  अशोकराव उकिरडे प्रगतशील शेतकरी शिवाजीराव जाधव नंदूभाऊ भागवत  अमोल  गायकवाड नितीनराव चौधरी मोहम्मद भाई  प्रभाकर उकिरडे पोलीस पाटील साळवे  आदी  उपस्थित होते मंडळ कृषी अधिकारी सी एम जवणे  कृषी पर्यवेक्षक सुनील गावित    आदींचे मार्गदर्शन लाभले  आजच्या शेतीशाळा वर्गामध्ये कापूस पिकाचे खत व्यवस्थापन निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी साठी निंबोळी अर्काचा वापर तसेच विद्राव्य खतांचा वापर कापूस पिकामध्ये आंतरमशागत करताना सायकल च्या माध्यमातून केले जाणारे आंतरमशागत तसेच सापळा पिके धने मका ज्वारी त्याच्या लागवडीचे महत्व इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे  यांनी केले कापूस पिकाबरोबरच सध्या शेतकरी प्रमुख समस्या असलेल्या सोयाबीनच्या पिवळेपणा घालवण्यासाठी सूक्ष्म मूलद्रव्य विद्राव्य खताची फवारणी आधी विषयावर कृषी सहाय्यकसचिन शिंदे साहेब यांनी माहिती दिली व सर्व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले कोरोना च्या पार्श्वभूमीवरसेनीटायझर वापर करून शेतीशाळा घेण्यात आलीशेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.