कोपरगाव शहराच्या प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव तयार करा -आमदार आशुतोष काळे कोपरगाव नगरपरिषदेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन...
कोपरगाव शहराच्या प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव तयार करा -आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी –
कोपरगाव शहरातील सुरु असलेली विकासकामे तातडीने मार्गी लावून प्रलंबित असलेल्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने तयार करावे सदर प्रस्तावांचा पाठपुरावा करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी जागतिक बँक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कोपरगाव येथे बैठक घेतली. या बैठकीसाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, हाजीमेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीरमामू कुरेशी आदी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे यांनी प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतांना विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील टपरीधारक व्यावसायिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या-त्या ठिकाणी अद्यावत व्यापारी संकुल निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करावा.भाजी मार्केटमधील गाळे व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा देखील प्रस्ताव तयार करावा व कोपरगाव शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. व शारदानगर परिसरात
पावसाचे पाणी येवून निर्माण होत असलेल्या अडचणींवर कायमचा तोडगा काढावा असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी जागतिक बँक अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.