Breaking News

साकुर येथील बिरोबा यात्रा रद्द; शेकडो वर्षांची परंपरा खंडीत !

साकुर येथील बिरोबा यात्रा रद्द; शेकडो वर्षांची परंपरा खंडीत

संगमनेर/प्रतिनिधी :
     संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साकुर येथे दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यात होत असलेली बिरोबा यात्रा उत्सवाची परंपरेला यावर्षी खंडित झाली आहे. यावर्षी कोरोनाचे संकट मानवी जीवनावर पडला बिरोबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. तसेच नागपंचमी व नारळी पौर्णिमा या दिवशी होणारी यंदाची यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली असून फक्त पहाटे व सायंकाळी विधीवत धार्मिक पूजा केली जाणार असल्याची माहिती विरभद्र बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ विरभद्र खिल्लारी यांनी दिली.
दरवर्षी नागपंचमी व नारळी पौर्णिमेला लाखो भाविक बिरोबाचे दर्शन घेतात. तर विशेषता नारळी पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक भक्त गंगेचे पाणी कावडीने पायी आणून बिरोबाला गंगास्नान घालतात. तर वाण, ओव्या, डफांचा आवाज, बिरोबाच्या नावान चांगभल या गजराने साकुर परिसरात भक्तिमय वातावरण तयार होत होते. तसेच यात्रेेेत विविध प्रकारचे दूकानेही थाटली जातात. मात्र यंदा यावरही बंदी घालण्यात आली आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे आदि जिल्ह्यातील तसेच विविध तालुके, विविध गावांमधून भाविक यात्रेला येत असतात. मात्र यंदा यावर्षी कोरोना या कोरोना महामारीचे भाविकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करता गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या वतीने सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी बिरोबा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. फक्त धार्मिक विधी विधी प्रमाणे केले जाणार आहेत. इतिहासात प्रथमच बिरोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना यंदा प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. तर भाविक कावडीने पाणी आणून बिरोबाला गंगा स्नान घालतात यावरही बंदी घालण्यात आली आहे. यंदाचे बिरोबाचे प्रत्यक्ष दर्शनही बंद ठेवले असून भाविकांनी साकुर येथे बिरोबा दर्शनाला न येता घरी राहूनच नामस्मरण करण्याचे आवाहन विरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ विरभद्र खिल्लारी (भगत) तसेच संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी केले आहे.