Breaking News

घोगरगाव येथे किरकोळ भांडणातून एकाचा खून
 योगेश चंदन/ कोळगाव प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस घटनास्थळी काही वेळातच दाखल होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
              श्रीगोंदा तालुक्यातील अहमदनगर सोलापूर हायवेवर घोगरगाव या ठिकाणी वेशीसमोर  झालेल्या किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन घोगरगाव येथील सुनील माणिक तरटे वय ४० या इसमाचा रस्त्यावर आपटून जागीच खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस कर्मचारी मुकेशकुमार बडे यांनी धाव घेतली असून काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचतील अशी प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून यातील सर्वच आरोपी फरार झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.