Breaking News

डिजिटल हल्ल्याने जग हादरले!

उद्योगपतींच्या नावे मागितले पैसे, अब्जावधींचा चुना
- ट्विटरवर सर्वात मोठा सायबर हल्ला, दिग्गजांचे अकाउंट हॅक
- लाखो युजर्सला बसला अब्जावधींचा फटका नवी दिल्ली/वृत्तसंस्था
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरेन बफे, अशा अनेक दिग्गज मंडळींचे अकाउंट हॅक करण्यात आले. हे अकाउंट हॅक केल्यानंतर, सर्व अकाउंट्सवरून ट्विट करत बिटकॉईच्या स्वरुपात पैशांची मागणी करण्यात आली. त्याला बळी पडून लाखो युजर्सने बिटकॉईन पाठवले. हाती आलेल्या माहितीनुसार, एक लाख 10 हजार डॉलर बिटकॉईन उकळण्यात आले असून, भारतीय पैशांत एका बिटकॉईनची किंमत सात लाख रुपये आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगभरात अब्जावधींचा चुना लावण्यात हॅकर्सना यश आले आहे. या हल्ल्याने जग अक्षरशः हादरून गेले होते.
अकाउंट हॅक केल्यानंतर उद्योगपती बिल गेट्स यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिन्यात आले होते, की प्रत्येक जण मला सांगत आहेत, की ही समालाजा परत देण्याची वेळ आहे. तर मी सांगू इच्छितो, की पुढील तीस मिनिटांत जे पेमेन्ट मला पाठवले जाईल, मी त्याच्या दुप्पट देईल. आपण 1000 डॉलरचा बिटक्वाइन पाठवा, मी 2000 डॉलर परत पाठवीन. ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. गुंतवणुकीचा विचार करता, लोकांना हे अत्यंत आकर्षक वाटते. सध्या हे जगातली सर्वात महाग चलन आहे. एका बिटकॉईनची किंमत सात लाख रुपयांच्या जवळपास आहे. सायबर सिक्योरिटीच्या अल्पेरोविच यांनी सांगितले, की या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांना मोठे नुकसान झाले असून, या हॅकदरम्यान हॅकर्सने जवळपास 300 लोकांकडून तब्बल 1 लाख 10 हजार डॉलर बिटकॉईन उकळले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अ‍ॅमेझॉन प्रमुख जेफ बेजोस, डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्यासंह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट एकाच वेळी हॅक करण्यात आले. तसेच, प्रत्येकाच्या अकाउंटवरून एकच ट्विट करण्यात आले, आपण बिटकॉईनच्या माध्यमाने पैसे पाठवा आणि आम्ही आपल्याला दुप्पट पैसे देऊ. त्याला बळी पडून लाखो युजर्सने आपले खिसे खाली केले. या प्रकरणानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष जॅक डॉर्सी यांनी ट्विटर अकाउंट्स हॅक प्रकरणाची चौकशी करत असल्याचे माहिती दिली. तसेच, हा प्रॉब्लेम सोडविला आहे, असे जाहीर केले. जॅक डॉर्सी यांनी ट्विटरवर झालेल्या सायबर हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला. डॉर्सी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरूनच यासंदर्भात भाष्य केले. आज ट्विटरमध्ये आमच्यासाठी खूप कठीण दिवस आहे. हे सारे घडल्याबद्दल आम्हाला वाईट वाटत आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि नक्की काय झाले हे समजून घेतल्यानंतर आम्ही यासंदर्भातील सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सध्या आमच्या टीम सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे डॉर्सी यांनी ट्विटवरून म्हटले.
नेमके काय झाले?भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ट्विटवरील काही दिग्गज मंडळीची अकाउंट हॅक करून त्यावरून विचित्र ट्विट करण्यात आले. यामध्ये बिटकॉइनद्वारे पैसे पाठवल्यास ते दुप्पट करून देणारी माहिती आणि खोटी लिंक शेअर करण्यात आली होती. त्यानंतर ट्विटरनेही यासंदर्भात ट्विट करून अनेक ट्विटर अकाउंटसंदर्भात समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. हॅक करण्यात आलेल्या अकाउंटमध्ये अ‍ॅपल, उबेर आणि अन्य काही कंपन्यांच्या ट्विटर अकाऊंट्सचाही समावेश आहे. या घटनेनंतर ट्विटरच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.