Breaking News

राष्ट्रवादीचे विद्यार्थी कॉग्रेस चे प्रदेशाध्यक्षपद पारनेर तालुक्या ला भेटणार ?

देवीभोयरे गावातील शिवव्याख्याते जितेशजी सरडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी लागणार वर्णी ?
राष्ट्रवादीचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपद पारनेरला भेटणार?

राज्याच्या राजकारणात पारनेर तालुक्यातील सामान्य घरातील युवकाला मिळणार संधी ?

पारनेर प्रतिनिधी -  
मा.आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव, अजिंक्यराणा पाटील यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर,नुकत्याच गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुलाखती पार पडल्या.गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावर महाराष्ट्रतील विविध भागातील विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या विद्यार्थी नेतृत्वांनी या पदासाठी दावा केला होता.
          पक्षाच्या निवड प्रक्रिये नुसार  हजारोंच्या संख्येने अर्ज केले पण निवड प्रक्रिया नुसार निवडक 40 ते 45 जणांना मुलाखती साठी बोलावण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहनजी यांनी इच्छुक उमेदवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुंबई ईथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली होती.परंतु संपूर्ण मुलाखतीमध्ये खास आकर्षण ठरले ते आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय शिवव्याख्याते जितेश सरडे  राष्ट्रवादी पक्ष कार्यकारिणीत सर्वसामान्य कुटुंबातील अनेक शिवव्याख्याते यांना पक्षाने आजवर संधी दिली आहे त्यात अमोलजी कोल्हे, अमोल मिटकरी यांचे नाव घेता येईल व या पदासाठी ही सरडे या नवीन शिवव्याख्याते यांची वर्णी लागणार असे चित्र स्पष्ट झाले आहे ?
          विधानसभा निवडणूक 2019 चे 224 पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेशजी लंके यांच्या प्रचारातील जाहीर सभांमध्ये आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच शहरी व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्या अडचणी जाणून घेत त्याचा प्रभावीपणे पाठपुरावा करत अनेक विद्यापीठांमध्ये तसेच अनेक प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर चर्चासत्रात भाग घेत विद्यार्थ्यांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडणारे व आपले वकृत्व व कर्तृत्व दाखवत राज्याच्या राजकारणात नवीन नेतृत्व तयार झाले आहे याची नोंद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली ? व श्री सरडे यांना मुलाखतीसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे  बोलावण्यात आले.आपल्या वैचारिक,अभ्यासू गुणवत्तेतुन महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी आजवर झालेली कार्यप्रणाली यात बदल करून भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचा मूलभूत समस्या व अडचणी कशा सोडवता येतील,विद्यार्थी संघटन कसे प्रभावी करता येईल यावर अभ्यासू विवेचन- श्री सरडे यांनी सदर मुलाखतीमध्ये दिले. त्यावर निवड प्रक्रियेतील मान्यवर प्रभावीत झाले आहेत. युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख, युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या  नंतर विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा सामान्य घरातील युवकाच्या खांद्यावर देऊन पक्ष पुन्हा एकदा सर्व सामान्यांना संधी देणारा पक्ष ही ओळख कायम ठेवणार का याची ही चर्चा सध्या रंगू लागली आहे.. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जितेश सरडे यांची वर्णी लागली तर निश्चितच सर्व सामान्य युवक राजकारणाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की !