Breaking News

.कोपरगाव सावधान कोरोना चा विळखा वाढतोय!

कोपरगाव सावधान कोरोना चा विळखा वाढतोय!
करंजी/प्रतिनिधी-
    दिवसागणिक कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत असल्याने कोपरगाव तालुक्यासह शहरात देखील घबराटीचे वातावरण पसरले आहे.
काल संपूर्ण तालुक्यात ५ बाधित रुग्ण आढळून आले होते, प्रशासनाने त्यांचा संपर्कातील लोकांना ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता काल कोपरगाव शहरातील सुख शांती नगर परिसरात जो पुरुष रुग्ण सापडला होता आज त्याची पत्नी कोरोना पॉसिटीव्ह आढळून आली आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ फुलसौंदर यांनी दिली आहे.
     त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णात अजून भर पडली असून आता तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७ झाली असून त्या मुळे तालुका प्रशासन देखील चिंतेत आहे.
    कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या नियमाचे पालन करत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करणे गरजेचे आहे.