Breaking News

कोपरगावात टाळेबंदीचे नियम तोडणाऱ्याकडून ६०७०० चा दंड वसूल !

कोपरगावात टाळेबंदी चे नियम तोडणाऱ्याकडून ६०७०० रु चा दंड वसूल !
 करंजी प्रतिनिधी- 
आज दिवसेंदिवस  कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत आहे दररोजचा दिवस उजाडतो तो कोरोना रुग्णाची वाढती संख्या घेऊन त्यामुळे आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या २९ इतकी मोठी झाली असून  यात आज कोपरगाव शहरातील ४ रुग्णाची व कोपरगाव तालुक्यातील पढेगाव या ग्रामीण भागातील १ रुग्णाची भर पडली असून या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण जरी पसरले असले तरीही अजून शहरातील व तालुक्यातील ग्रामिण भागातील नागरिकांना त्याचे भान दिसत नाहीय असे दिसून येत आहे आज  शनिवार कोपरगावत टाळेबंदी असतांना तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील नागरिकांचा राजरोस पणे शहरात वावर दिसत आहे त्या मुळे आज जरी कोपरगावात रुग्ण संख्या कमी दिसत असली तरी या बेशिस्तीमुळे आकडा वाढू शकतो यात शंका नाही म्हणून नागरिकांनी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे.
      प्रशासन आपल्या वतीने सर्वोत्तपरी प्रयत्न करतांना दिसत आहे त्याचाच भाग म्हणून आज कोपरगाव शहर चे पोलिस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर साहेब यांनी आपल्या फौजफाट्यासह कोपरगाव शहरात प्रवेश करणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल २३३ केसेस ची नोंद करत ६०७०० रुपये इतका दंड वसूल केला आसल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
   यात प्रशासनाचे नियम तोडणे, डबल सीट फिरणे अशा स्वरूपात १९५ केसेस ची नोंद करत २०० रुपये प्रमाणे तब्बल ३९०००/-, ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे नसणे ५०० रुपये प्रमाणे ३४ केसेस करत १७०००/- रुपये, फॅन्सी नंबर प्लेट च्या २ केसेस करत २०००/- रुपये, इन्शुरन्स नसणे, विना परवानगी तालुक्यात येणे अशी एक केस करत २०००/- रुपये दंड केला, लायसन्स कागदपत्रे नसणे  प्रशासनाचे अनलॉक चे  नियम तोडणे अशी एक केस करत ७००/- रुपये दंड करण्यात आला. अशी कारवाई कोपरगाव पोलिस प्रशासनाच्या वतीने करत  साठ हजार सातशे रुपये मात्र इतका दंड अनलॉक चे नियम तोडणार्या बेजबाबदार नागरिकांन कडून वसूल करण्यात आला आहे, कोपरगाव पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात येते की अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नसून बेजबाबदार पणे वागू नका प्रशासनास सहकार्य करा, तरच आपण कोरोनाला हारवू शकतो.