Breaking News

मुलीच हुश्शार!

- इयत्ता बारावीचा निकाल जाहीर- निकालात मुलींचीच बाजी- राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के


पुणे/ विशेष प्रतिनिधी
इयत्ता बारावीचा (एचएससी) निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे. यंदा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला असून, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के असून, मुलांचा निकाल 88.04 टक्के आहे. दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
गेल्या वर्षी 12 वी चा निकाल 85.88 % लागला होता. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 95.89 टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे. राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च 2020 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी 14 लाख 20 हजार 575 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 14 लाख 13 हजार 687 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख  81 हजार 712  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल 93.88 टक्के तर मुलांचा निकाल 88.04 टक्के लागला आहे. कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होता. मात्र, विद्यार्थी व पालकांची निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर सर्व अडचणींवर मात करून गुरुवारी राज्य मंडळाने निकाल जाहीर केला.

विभागीय मंडळ निहाय निकाल
पुणे  :92. 50 टक्के
नागपूर : 91.65  टक्के
औरंगाबाद :88 .18 टक्के
मुंबई  :89 .35 टक्के
कोल्हापूर  :92 .42 टक्के
अमरावती  :92.09  टक्के
नाशिक :88 .87 टक्के
लातूर  : 89. 79 टक्के
कोकण : 95 . 89 टक्के

शाखानिहाय निकाल
 कला - 82.63
 वाणिज्य - 91.27
 विज्ञान - 96.93
व्यवसायिक अभ्यासक्रम- 86.07

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com 

www.hscresult.mkcl.org