Breaking News

जनतेशी प्रामाणिक राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे ,आ, डॉ किरण लाहमटे

जनतेशी प्रामाणिक राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे ,आ, डॉ किरण लाहमटे   
      
 राजूर प्रतिनिधी :
 सध्या अकोल्याचे राजकारण चांगलेच तापले आहे आरोप प्रत्यारोप हे बघायला मिळत आहे जलपूजन , उदघाटन या वर पण राजकीय चर्चा जोरदार चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी वर तालुक्याचे आमदार मा,  डाॅ.किरण लहामटे यांनी आपली बाजू मांडली ते म्हणाले
काही दिवसांपूर्वी कोतुळ कोथळे रस्त्यावर निकृष्ट झाल्याच्या सोशल मिडियाच्या माध्यमातुन बातम्या आल्यानंतर सदर ठिकाणी उपकार्यकारी अभियंता काकडे, कार्यकारी अभियंता पाटिल साहेब साहेब,पाचोरे साहेब यांना बरोबर घेईन कामांत होणाऱ्या चुका लक्षात आणुन देऊन आवश्यक असणाऱ्या गोष्टींची दुरूस्ती करण्याच्या सुचना केल्या आहेत व अधिकारी वर्गाने यात दुरूस्ती करण्याचे मान्य केले आहे.जनतेने चुकीची कामे लक्षात आणुन दिल्यानंतर मी त्या संदर्भात कायम दखल घेत असतो.मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीला मी पाठीशी घालणार नाही माञ काही मंडळी जाणीवपूर्वक नाहक बदनामी करण्याचा मानस ठेऊन आहेत.मी ज्या दिवसापासून लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हा पासुन मी जवळजवळ प्रत्येक गावात एक ते दोन,काही गावांत चार,चार वेळेस जाऊन आलो.गावकरी, गावात गेल्यानंतर ज्या प्राथमिक गरजेच्या गोष्टी करण्यासारख्या असतील त्या पुर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.कोणते ही रास्ता रोको,आंदोलन .करण्यापूर्वी माझ्या सोबत प्राथमिक चर्चा करणे अपेक्षित असते.जर यातुन मार्ग किंवा अपेक्षीत उत्तरे मिळाली नसतील तर नक्कीच लोकशाही मार्गाने आंदोलने करणे उचित असते.
     जर ही लढाई आंदोलनकर्त्यांना वाटते अधिकारी वर्गाशी आहे तर त्यांनी त्यांच्याशी लढावे,माञ माझी भुमिका जर आंदोलकांची माझ्याशी निगडित असेल तर माझ्याशी प्राथमिक चर्चा होणे ही माझी अपेक्षा गैर आहे. माञ आंदोलन करुन जनतेच्या मनात चुकीचा संभ्रम तयार करण्यासाठी काही मंडळी खटाटोप करत आहेत.मुळा विभागासह अनेक रस्त्यांचे प्रस्ताव सादर केले गेले आहेत.माञ कोरोना कालावधी व सरकारकडे असलेल्या निधीच्या कमतरतेमुळे निधी मिळण्यास अडचण झाली आहे.ज्या काही माझ्या हितचिंतकांनी माझ्या कामांचा हिशोब मागण्यास सुरवात केली आहे.त्यांनी चाळीस वर्षात एकदाही हिशोब विचारला नाही.त्यांना माझ्या आठ महिन्यांच्या कालावधीत हिशोब विचारण्याची घाई झाली मला अडीच तीन वर्षानंतर मी अकोलेच्या जनतेने हिशोब देण्यास बांधील आहे.ती माझी नौतिक जबाबदारी ही आहे.कोतुळ-कोथळे,राजुर,-पाचनई या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.मंजुरी ही मिळाली आहे माञ निधी अभावी वर्क आर्डर मिळणे बाकी आहे.माञ कोणत्याही गोष्टी अस्तित्वात येण्यासाठी एक प्रोसेस असते.त्यात कोरोना कालावधीमुळे निधी मिळण्यास अडचणी या सर्व जनतेला समोर असताना काही मंडळी चुकीचा भ्रम परसवत.माञ मी आमदार डाॅ.किरण लहामटे आपणास नम्रपणे सांगु इच्छीतो की अकोलेकरांनी मोठा विश्वास टाकुन मला अकोले मतदार संघाचे लोकप्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे.त्यांच्या प्रती प्रमाणीक राहणे माझे नौतिक जबाबदारी आहे.माञ कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्या गोष्टीची शहानिशा व सतत्या पडताळून विश्वास ठेवावा.