Breaking News

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ३७ रुग्णांची कोरोनावर मात तर आज वाढले २४ रुग्ण

अहमदनगर/प्रतिनिधी :
 अहमदनगर जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२,अकोले तालुका ०२, जामखेड,राहाता,संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. याचबरोबर आज येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
नगर शहरातील १४, भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) ०१, दाढ बु. (राहाता) ०१,  खेरडे (पाथर्डी) ०१, भोंदरे (पारनेर) ०१, केसापुर (राहुरी) ०१, कोळगाव (श्रीगोंदा) ०१