Breaking News

डिझेलचे दर पुन्हा वाढले !

डिझेलचे दर पुन्हा वाढले
मुंबई / प्रतिनिधी
तेल कंपन्यानी पेट्रोलचे दर स्थिर ठेवून डिझेलचे दर वाढविले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात डिझेलचे दर नऊ वेळा वाढविले असून, दिल्लीत डिझेलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे.
शनिवारपासून डिझेलच्या दरात १.४५ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्याच्या किंमतीत अखेरची वाढ २९ जून रोजी झाली होती, तीदेखील प्रतिलिटर फक्त ५ पैसे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ८०.४३ रुपये असताना डिझेल ८१.७९ रुपयांवर गेले. दिल्ली हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.
--------------------