Breaking News

कोरोनाचा आलेख कोपरगावात वाढतोय !

कोरोनाचा विळखा कोपरगावात वाढता!
  करंजी प्रतिनिधी-
 मागील चार दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील कोर्ट रोड भागातील एक ५८ वर्षीय डॉ कोरोना बाधित आढळून आला असता त्यांचा संपर्कातील १२ जणांचे स्वाब पुढील तपासणी साठी कोपरगाव प्रशासनाने २३ जुलै रोजी पाठवले होते ते आता प्राप्त झाले असून त्यात ३ अहवाल पॉजिटीव्ह आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
  या ३ अहवालात कोर्ट रोड च्या बाधित डॉक्टराची पत्नी ६० वर्ष, मुलगा ३४ वर्ष व सुन २९ वर्ष यांचा समावेश असून ९ अहवाल निगेटीव्ह आले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या आता २७ झाली आहे.