Breaking News

शिर्डीत कोरोना हॉस्पीटल चालू करावे.अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार संजय काळेंचा राज्य शासनाला इशारा !

शिर्डीत कोरोना हॉस्पीटल चालू करावे.अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार संजय काळेंचा राज्य शासनाला इशारा
   कोपरगाव प्रतिनिधी - 
अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे.देशात कोरोना रोजचे रोज पाय मजबूत रोवत आहे. कोरोनाचा खरा प्रसार उदघाटने, दहावे, मौती , लग्न समारंभ हे सगळे मुळ कारणे आहेत.
          अहमदनगर जिल्ह्यात कोरोना वाढू लागला असुन,येणारे महिने मोठे धोक्याचे आहेत, श्वसनाच्या आजाराचा हा हंगाम आहे.जर कोरोना रूग्ण वाढू लागले तर शासनाचे दवाखाने अपूरे पडणार असल्याची शंका आहे.  हल्ली इनफेक्टीव्ह रूग्ण असले तर अहमदनगरला हलवावे लागतात
जिल्ह्याचे विभाजन झाले असते तर कोपरगाव शिर्डी संगमनेर अथवा श्रीरामपूर येथे जिल्हा रूग्णालय  झाले असते.. रूग्णांची सोय झाली असती..  जिल्ह्याला अनाधी काळा पासून तीन तीन मंत्री आहेत पण जिल्हा विभाजन नाही आणि जनतेला अद्ययावत सुविधा नाही..
   कोरोनाच्या ह्या  काळातील वाढ पहाता गरीब जनतेसाठी उत्तर नगर जिल्ह्यात सुविधा वाढवावी लागेल.त्यासाठी शासनाकडे एकच स्वस्त पर्याय आहे.. शासनाने साईबाबा संस्थानचे द्वारावती भक्त निवास ज्या मध्ये २५० अद्ययावत खोल्या आहेत ...त्याचे रूपांतर प्रत्येक खोलीत व्हेंटिलेटर व इतर सुविधा निर्माण करून कोव्हीड कोरोना हॉस्पिटल मध्ये रूपांतरीत करावे.
राज्य शासनाने मा उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन युध्द पातळीवर ही सुविधा निर्माण करून घ्यावी..संस्थानच्या उपलब्ध निधी मधून भक्त निवासाचे रूपांतर कोविड हॉस्पीटल मध्ये व्हावे.. सामाजिक संघटनातून स्वयंसेवक अथवा युध्द पातळीवर स्टाफ भरती करून सुविधा निर्माण करावी.. आठ दिवसात  शासनाने निर्णय न घेतल्यास  उच्च न्यायालयात जनहितार्थ गरीब जनतेसाठी याचिका दाखल करणार असल्याचे इशारा राज्य शासनाचे मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.