Breaking News

कोरोनामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता साने यांचे निधन

पिंपरी- चिंचवड /प्रतिनिधी
 पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय ५४) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात त्यांचे निधन झाले. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
    साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता.
25 जून रोजी  त्यांना कोरोनाची (Covid19) लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात सर्वानाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.