Breaking News

पारनेर तालुक्यातील हंगा व वाळवणे येथे कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यातील हंगा व वाळवणे येथे कोरोना बाधित

  पारनेर प्रतिनिधी - 
  पारनेर तालुक्यात कोरोना चा वाढता आलेख सुरू आहे तालुक्यातील आतापर्यंत जी कोरोना लागण झाली आहे हि संख्या शंभरच्या पुढे गेली आहे आज दि.24 जुलै रोजी   आलेल्या खाजगी लॅब च्या अहवालानुसार वाळवणे व हंगा येथील प्रत्येकी एक जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
   अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
वाळवणे येथील व्यक्ती हा यापूर्वी कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला तालुक्यात दिवसभरात तीन व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत दुपारी न्यायालयातील कर्मचारी कोरणा बाधित आढळला आहे त्यानंतर न्यायालयातील संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहे.
बाधित व्यक्ती आढळल्या त्या दोन्ही गावात तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश आहेत तेथील शंभर मीटर परिसर 14 दिवस कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे असा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे.