Breaking News

दूध दरवाढी साठी अकोल्यात दुग्धअभिषेक आंदोलन !

दूध दरवाढी साठी अकोल्यात दुग्धअभिषेक आंदोलन !
 अकोले प्रतिनिधी :
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव मिळालाच पाहिजे यासाठी शासनाने 10रुपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने वर्ग करावे या प्रमुख मागणीसाठी आज दि 20 जुलै 2020 रोजी अकोले येथून दुग्धभिषेक करून आंदोलनास सुरवात झाली. या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरत असून अकोले तालुक्यातही उद्या 21 जुलै पासून तालुकाभर दुग्धभिषेक आंदोलन हाती घेण्यात आले आहे.

यावेळी  डॉ. अजित नवले, महेश नवले.  शांताराम वाळुंज. बाळासाहेब ताजणे, डॉ. संदीप कडलग, गणेश ताजणे  सोमनाथ  नवले. सुरेशराव नवले. विजयराव वाकचौरे, प्रकाश वाकचौरे.रोहिदास धुमाळ, खंडूबाबा वाकचौरे. सचिन शेटे, परशुराम शेळके.
 प्रकाश आनंदा मालुंजकर.सुशांत आरोटे, शुभम आंबरे. दूध उत्पादक शेतकरी ,संघर्ष समिती. चे  कार्यकर्ते उपस्थित होते.
--------