Breaking News

भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयानेच विकासाची गंगा खेड्यात आली -- कोल्हे

भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयानेच विकासाची गंगा खेड्यात आली -- कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 मागील सरकारच्या काळात ग्रामविकासाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गाव खेडयांपर्यंत विकासाची गंगा आली, आणि त्यामुळेच ख-या अर्थाने खेडी समृध्द होत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
 तालुक्यातील खोपडी येथे सन २०१८-२०१९ च्या ग्रामविकास विकास निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचेे लोकार्पण सौ कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करण्यात आलेल्या कार्यक्रमास उत्तर नगर जिल्हा उपप्रमुख प्रमोद लबडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरपंच संभाजी नवले, मोहनराव जाधव आदी उपस्थित होते, यावेळी सौ कोल्हे पुढे म्हणाल्या, मतदार संघातील अनेक आव्हाने घेउन मी गेली पाच वर्षे मतदार संघाचा विकास करण्याचे काम हाती घेतले, अनेक समाजहिताच्या कामांना प्राधान्य दिल्यामुळेच खेडयापर्यंतची रस्ते करता आली, रस्त्यांमुळे दळणवळण सुरळीत होउन खेडी शहराला जोडली गेल्याने गावागावात सुबत्तता आली. खोपडी येथील खंडोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृहाचे कामासाठी १० लाखाचा निधी देउन सदरचे काम पुर्ण करता आल्याचे समाधान असून या गावासाठी धोत्रे ते खोपडी या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी १ केाटी ७१ लाख रूपये, स्मशानभूमी बैठक शेडच्या कामासाठी ४ लाख, संरक्षक भिंत, दहन शेड  व पेव्हिंग ब्लाॅकच्या कामासाठी १० लाख देता आला. त्याचप्रमाणे राप्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ४६ लाख ६० हजाराचा निधी मंजूर करता आला, या योजनेचेही काम प्रगतीपथावर आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वांनी काळजी घेण्याची आवष्यकता असून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने घालुन दिलेले नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहनही सौ कोल्हे यांनी केले.
उत्तर जिल्हा उपप्रमुख प्रमोद लबडे यावेळी म्हणाले, सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असून विद्यामान खासदार, आमदारांना कोणत्याही प्रकारचा स्थानिक विकास निधी आलेला नाही, त्यामुळे मतदार संघात माजी आमदार सौ कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील मंजुर झालेली विकासकामे सुरू आहे. मात्र शासकीय शिष्टाचारानुसार त्याचे श्रेय कोणाला जात असेल म्हणजे ती कामे त्यांनी मंजुर केले असे म्हणता येणार नाही, परंतु या श्रेयवादात जाण्यापेक्षा आज कोरोनाच्या परिस्थतीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आलेला आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे श्री लबडे म्हणाले. यावेळी कार्यक्रमास ज्येप्ठ कार्यकर्ते विठठलराव नवले, जयराम वारकर, उपसरपंच शिवाजीराव वारकर, अशोकराव नवले, रमेश नवले, संतोप ठुबे, ज्ञानेश्वर पवार, चांगदेव नवले, संजय भवर, 
घनश्याम वारकर, मछिंद्र नवले, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच धोत्रेचे सरपंच अशोक गवारे, सुरेश जाधव, विजय जामदार, प्रदीप चव्हाण, विजय काटे, गोरख टुपके, रोहीदास जाधव, बाबासाहेब जाधव,  ठेकेदार किशोर  परजणे उपस्थित होते.

[ आमंत्रण नसतांना पंगतीत जाउन जेवल्याने संतुष्ट होण्यापेक्षा अपचन होत असते. पण आपल्या संरपंचानी अधिकृत आमंत्रण दिल्याने मी येथे आलो आहे, गावासाठी चांगल होत असतांना खोटा कोण आहे, याचा शोध घ्या, असे मछिंद्र नवले यांनी आपल्या भाषणात सांगितले ]