Breaking News

श्री विवेकानंद विद्यामंदिर बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी !


श्री विवेकानंद विद्यामंदिर बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी !
पाथर्डी/प्रतिनिधी : 
    काल  एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा मार्च २०२० चा निकाल जाहिर झाला असून यात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे,श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.विद्यालयाचा सेमी इंग्रजी विभागाचा १००% निकाल लागला.विद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कायम ठेवली
      डोईफोडे गजानन खंडेराव याने ९६.४०% गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच खेडकर साक्षी भागिनाथ -९६ .२०% गुण द्वितीय क्रमांक,व वामन शिवाजंली अशोककुमार -९५ .८० टक्के तृतीय क्रमांक,तर सानप संपदा संजय व वाघ महेश नितीन -९५ .२० टक्के चतुर्थ क्रमांक, दौंड साईराज उध्दव -९४ .८०- पाचवा क्रमांक मिळवला.
     विद्यालयाच्या निकालाचे वैशिष्ट्य असे की,विद्यालयातील ९० टक्केपेक्षा जास्त गुण ४६ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले.तर
१६६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह ७५ टक्के जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले तसेच
विशेष म्हणजे गणित विषयात १०० पैकी १०० गुण दौंड साईराज उध्दव याने प्राप्त केले .
विद्यालयातील ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले .
       सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संपत घारे ,अभिजीत सरोदे, रेश्मा सातपुते,अर्चना दराडे,तुषार शिंदे,संदीप धायतडक,यशवंत साळवे,सानिका वखरे,संदिप आव्हाड,दिपक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले .
   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड  , उपाध्यक्ष अॅड.सुरेशराव आव्हाड तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य- विश्वस्त ,मुख्याध्यापिका शारदा बारवकर ,पर्यवेक्षिका शिला फुंदे व समन्वयक ज्ञानेश्वर गायके तसेच सर्व अध्यापक यांनी  अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .