Breaking News

सरस्वती मंदिर रात्र प्रशालेचा इ.१० वी चा निकाल ८६.६६ % मार्गशी अजबे हिने प्रथम क्रमांक पटकावला !

सरस्वती मंदिर रात्र प्रशालेचा   इ.१० वी चा निकाल ८६.६६ %
 मार्गशी अजबे हिने प्रथम क्रमांक पटकावला 
अहमदनगर :
 नव विद्या प्रसारक मंडळाचे सरस्वती मंदिर रात्र प्रशालेची उत्तुंग यशस्वी  निकालाची परंपरा कायम ठेवत  मार्गश्री अजबे हिने ६७.२० % गुण मिळवून प्रथम क्रमांक,तर द्वितीय  क्रमांक कु आकांक्षा भराटे ६५.००% तर तृतीय क्रमांक  रेश्मा शेख ६२.८०% टक्के  गुण मिळवून .शाळेचा इ.१० वी चा निकाल ८६.६६  % इतका लागला आहे. कष्टणाऱ्या हातांना शिक्षण आणि संस्कार देणारी रात्रप्रशाला गरजू गरीब कष्टकरी तसेच कुटुंबाची जबाबदारी पेलवून अर्थार्जन करत ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी रात्र शाळेत घडत आहेत. उत्तुंग यशाची परंपरा कायम राखत या रात्रप्रशालेतील  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, मानद सचिव निलेश वैकर, साहेब सहसचिव  चंद्रशेखर धर्माधिकारी साहेब व मंडळाच्या सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक  विलास शिंदे शाळेतील शिक्षक  लबडे देवका,श्रीमती विना कुह्राडे , श्रीमती सुषमा धारूरकर, शिक्षकेतर कर्मचारी  भुजबळ राजू  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.