सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते निघोज येथे रस्ता कामाचे भूमिपूजन निघोज प्रतिनिधी - जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना 2019-...
सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते निघोज येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
निघोज प्रतिनिधी -
जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना 2019-20 अंतर्गत खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर
मौजे.निघोजकुंड ते सुलाखेवाडी रस्ता डांबरीकरण करणे-17 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले .
या रस्ता कामाचा भूमिपूजन समारंभ संदीप वराळ पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सरपंच एस. के. पाटील वराळ हे होते.
तसेच कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भास्करभाऊ वराळ,मंगेशदादा लाळगे,शितलताई वराळ,सुमनताई लोहकरे,सुनीलदादा पवार,जाकीरभाई तांबोळी, बबन सुलाखे,मंगेशभाऊ वराळ,रावसाहेब वराळ,किसन वराळ,संतोष वराळ,दत्ता वराळ,तुकाराम लोहकरे,राजू वराळ,चंद्रकांत दातीर,रामा पवार, नितिन बिबवे,बाळू बिबवे,दिपक जाधव,हृतिक लंके,अक्षय वराळ,रमीज शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.